२०१२ साली लिहिलेला मी हा लेख... परत मला या २०२० ला प्रकाशित करावासा वाटला...
नमन नटवरा विस्मयकारा... नांदी ... सुरुवात एका नाट्याची...
की नवीन युगाची...?
...कुणासाठी नवीन आयुष्याची, तर कुणासाठी नवीन कामाची...!
काहीही असो पण नांदी महत्वाची... "चला सुरुवात तर झाली... पुढचं पुढे..!"
आता हेच पहा... अण्णा उपोषणाला बसले, आणि झोपी गेलेला सामान्य माणूसही जागा झाला... सुरुवातच असेल का ही नवक्रांतीची? नव्या भारताच्या ओळखीची...? पण भ्रष्टाचाराने माखलेल्या या आपल्या राज्यकर्त्यांना ... नव्हे अखंड समाजास स्वत:च्याच पश्चातापात न्हाउन भाग पाडण्यास... एक अण्णा आणि त्याचे पाठीराखे यांना किती यातना सोसाव्या लागतायत...
लागणारच...
नांदीचा नियमच आहे तो... प्रत्येक नांदीला विनाशाची अन् यातनांची किनार जी असते!
अण्णांनी सुरु केलेली ही नांदी कदाचित नवीन विश्वाची असेल...अशी नांदी जिची सुरुवात जगाच्या इतर प्रांतातही झालेली आहे... जनता पेटून उठते आहे आणि अन्यायाला झुगारते आहे!
सारे जग धुतलं जातयं... आणि एका स्वच्छ जगाची सुरुवात होतेय... अर्थात एका विनाशातूनच!
नवीन बियाणं पेरण्या करता जी जमिन भाजली जातेय... कष्टकरी जागा झालाय आणि इतरानाही जागं करतोय ! हाच असेल का खरा 'जिहाद'...? एक 'कयामत' येतेय एक नवीन 'जन्नत' रुजविण्यासाठी! तरूण जागा होतोय... या पृथ्वीस आणि पृथ्वीवर स्वत:स तारण्या साठी!
बहुचर्चित , माया संस्कृतीच्या भाकिता प्रमाणे २०१२ सालानंतर विश्व नव युगास सामोरे जाइल... त्याचे कारण हेच नसेल कशावरुन... शब्दांच्या त्या अवजड कोंदणात भाकितकाराने कदाचित हेच भविष्य कोरलं असेल... "संपूर्ण जगभरात एका विनाशाची सुरुवात होईल...विनाशाची ...भ्रष्टाचारच्या... जाती अन् धर्मवादाच्या... असत्याच्या... लिंग अन् लैंगिकतेच्या आधारावर उभ्या असलेल्या या कर्मठ अन् 'धर्माधिष्ठीत' रहाणीच्या विनाशाची... माणुसकीला काळीमा फासणाऱ्या मानवाच्या प्रत्येक कृत्याच्य विनाशाची...!
विनाशाची एक नांदी, एका नांदीच्या उदयासाठी...!!!"
मी वाट पहातो आहे...!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा