शाळेत असतांना चवथ्या इयत्तेतील उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीच्या डोंबिवलीच्या घराच्या बाल्कनीत पहिले बड्बड गीत मी गुणग़ुणलो… बोलता बोलताच लक्षात आलं की यमक जुळलं …. आणि तिथ पासून माझं कवितेशी सुतक जुळलं! कविता वाचन अन् पठण होतचं पण आता लिखाणंही सुरू झालं. मनातले सगळेच भाव नि भावना कागदाच्या तुकड्यावर शब्दरुपात लयात उतरत गेल्या… अन् स्वानुभवाची एक नित्यदिनीच झाली! ह्ळुह्ळू प्रत्येक गोष्ट कवितेस सांगितल्याविना चैनच पडेना… हक्काची सखीच झाली ती…
एक गंमत म्हंजे कविता सगळं दड्वून ठेवते...गद्या सारखं सगळं जगजाहिर करत नाही ती… स्त्रियांच्या पोटात काही रहात नाही म्हणतात, कविता त्याला अपवादच!
त्यामुळे बालपणीची लुटूपुटूची भांडणे म्हणा वा तारुण्यातला तड्फदार गुस्सा… किंवा हरवलेलं प्रेम सारच कवितेने जपलयं!
व्यवसायाने वास्तु विशारद झालो आणि कामाच्या व्यापात कवितेशी असलेलं माझं नातं थोडं दुरावलं … पण कविता रुसली नाही, रागावली नाही ती अजून मनातलं गुपित जपून आहे…
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा